Published On : Fri, Mar 19th, 2021

20 वर्षीय मतिमंद मुलाच्या शोधार्थ आई ची वणवण भटकंती

कामठी :-मुलगा वयाने कितीही मोठा झाला तरी आई साठी तो लहानच असतो आणि कितीही वेडा वा मतिमंद असला तरी तिची मायेची ऊब ही कधीही कमी होत नाही .यावरच आधारित एक घटना दृष्टिक्षेपास पडते की मागील 2019 च्या दसऱ्याच्या सणाला कामठी ला मुलीच्या सासरी असलेल्या चांद्रमनी नगर येथे अलाहाबाद जिल्ह्यातील अल्लापुर गावाहून आई व मतिमंद मुलगा आले असता दुसऱ्या दिवशी सदर मतिमंद मुलगा हा सकाळी आठ वाजता झोपेतून उठल्यावर कुठे गेला याची माहिती च कळली नाही याच्या शोधार्थ जिकडे तिकडे शोध घेऊनही कुठेही या मिसिंग झालेल्या मतिमंद मुलाचा थांगपत्ता लागला नाही तर मिसिंग झालेल्या या मुलाचे नाव गोलू रमेशचंद्र गोरी वय 20वर्षे रा अल्लापुर जिल्हा अलाहाबाद असे आहे.

यासंदर्भांत आई गुलाबदेवी गोरी यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून 8 ऑक्टोबर 2019 ला मिसिंगची तक्रार नोंद करून घेतली .पोलीस विभागातर्फे शोध पत्रिका प्रसिद्ध करून तसेच शोध सुद्धा घेण्यात आला मात्र शोधकामात आलेल्या अपयशा मुळे हरविलेला तरुण गोलू गोरी हा आज 15 महिने लोटूनही आई ला मिळू शकला नाही मात्र मुलाच्या आठवणीने दुःखी असलेली ही आई गुलाबदेवी दररोज पोलिस स्टेशन च्या पायऱ्या च्या उंबरठे झिजवित आहे तेव्हा हरविलेला मतिमंद तरुण गोलू गोरी हा 5फूट 5 इंचीचा असून रंग गोरा, केस -काळे, बांधा मजबूत, तसेच अंगात काळ्या रंगाची टी शर्ट व पायात निळ्या रंगाचा फुलप्यांट आहे , पायात चप्पल घातलेला आहे अशा वर्णनात्मक तरुण दिसल्यास किमान आईच्या भावनेची जाणीव घेऊन नविन कामठी पोलीस स्टेशन चे द्य्रध्वनी क्रमांक 07109-288646, 8669023296, ला संपर्क करावे असे आव्हान वरिष्ठ पोलीस नीरिक्षक संजय मेंढे यांनी केले आहे.

संदीप कांबळे