Published On : Sun, Dec 1st, 2019

अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाचा आक्रमक पवित्रा – महापौर

आसीनगर व मंगळवारी झोनमधील नगरसेवकांसोबत बैठक

नागपूर: अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिका येत्या काही दिवसात आक्रमक पवित्रा घेणार आहे. यात कुणिही हलगर्जीपणा केल्यास त्यावर कठोर कारवाई करू, असा ईशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. सर्व नगरसेवकांच्या स्वच्छता, कचरा संकलन, अतिक्रमण याविषयावरील समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांच्या झोननिहाय बैठकी सुरू आहे. शनिवारी महापौर संदीप जोशी यांनी आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये बैठक घेतली.

Advertisement

आसीनगर येथील बैठकीत झोन सभापती विरंका भिवगडे, दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, नगरसेवक परसराम मानवटकर, मोहम्मद तौफिक ईब्राहिम टेलर, मोहम्मद जमाल, जीतेंद्र घोडेस्वार, मनोज सांगोळे, दिनेश यादव, नगरसेविका भावना लोणारे, नेहा निकोसे, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

आसीनगर झोनमधील कचरा संकलन आता पूर्वीपेक्षा सुरळीत सुरू असल्याचे झोनमधील सर्व नगरसेवकांनी सांगितले. कचरा हा वेळेत उचलल्या जात असल्याचेही नगरसेवकांनी सांगितले. फक्त काही प्रभागात आऊटर रिंग रोडवरील कचरा उचलल्या नसल्याची तक्रार मंगला लांजेवार यांनी केली. यावर उपस्थित बीव्हिजी या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्याठिकाणी यंत्रणा सज्ज हाईल, असे सांगितले. आठवडी बाजारांमध्ये दुकानदारांजवळ कचरा जमा करण्यासाठी त्यांच्याजवळ कचरा जमा करण्यासाठी कचरा पेटी आवश्यक करावी, अशी सूचना नगरसेवक मनोज सांगोळे यांनी केली.मोकळ्या भुखंडावर कचरा टाकत असल्याचीही तक्रार नगरसेविका वैशाली नारनवरे यांनी केली. उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाद्वारे कारवाई करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. परिसरातील धार्मिकस्थळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमानंतर उरलेले अन्न टाकण्यात येते, अशी समस्या जितेंद्र घोडेस्वार यांनी मांडली. अतिक्रमणाबाबत ही नगरसेवकांनी आपल्या समस्या महापौरांपुढे मांडल्या. उपद्रव शोध प्रतिबंध पथकाद्वारे वसुल करण्यात येणाऱ्या दंडाबाबत आढावा घेतला.

मंगळवारी झोनमधील बैठकीत सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, झोन सभापती गार्गी चोपरा, नगरसेवक महेंद्र धनविजय, किशोर जिचकार, नरेंद्र वालदे, भूषण शिंगणे, नगरेसविका संगिता गिऱ्हे, सुषमा चौधरी, अर्चना पाठक, रश्मी धुर्वे, स्नेहा निकोसे, सहायक आयुक्त हरिश राऊत, झोनल अधिकारी, स्वास्थ निरिक्षक, उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाचे प्रतिनधी उपस्थित होते.

मंगळवारी झोनमध्येही कचरा संकलन हे पूर्वीपेक्षा व्यवस्थित होत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. काही ठिकाणी गडरलाईन चोकेजची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. मोकळ्या भुखंडावर नागरिक कचरा टाकत असल्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून आली. मोकळ्या भुखंडावर कचरा टाकणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात यावा, असे निर्देश दिले. मोकळ्या भुखंडावर दर्शनी भागात सूचना फलक लावण्यात यावे, असेही महापौरांनी सुचविले. आनंदनगर येथील अतिक्रमणाचा नागरिकांना फार त्रास होत असल्याची तक्रार सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मांडली. यावर तातडीने अतिक्रमण मोडण्याचे कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कर्मचाऱ्यांची झोन मध्ये आवश्यकता आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

कॅटरिंग व्यावसायिकांबाबत नवे धोरण आखणार

शहरातील कॅटरिंग व्यावसायिकांबाबत नागपूर महानगरपालिकेद्वारे नवे धोरण तयार करण्यात येणार आहे. सर्व कॅटरिंग व्यावसायिकांना नागपूर महानगरपालिकेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क हे नाममात्र राहणार आहे. ज्याठिकाणी कॅटरिंग व्यावसायिकांचे काम आहे, त्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी ही त्याची राहील. त्याने काम केलेल्या परिसरात कचरा, उरलेले अन्न टाकलेले आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement