Published On : Sun, Dec 1st, 2019

दुबे परिवाराने तब्बल ८० वर्ष दिली मनपाला सेवा

Advertisement

सेवानिवृत्त निगम सचिव हरीश दुबे यांनी दिला आठवणींना उजाळा

नागपूर : प्रशासकीय कार्यामधून दुबे परिवारातील वडील व मुलाने तब्बल ८० वर्ष नागपूर महानगरपालिकेला सेवा प्रदान केली. सहायक शिक्षक म्हणून नियुक्त झालेले नवलकिशोर दुबे शिक्षणाधिकारी अशी ४१ वर्ष सेवा देत निवृत्त झाले तर ग्रंथालय अधीक्षक ते निगम सचिव अशी ३८ वर्ष दिर्घ सेवा देत आज सेवानिवृत्त होत असताना संपूर्ण कार्यकाळ डोळ्यापुढे राहत आहे, अशी भावना मनपा सेवेतून सेवानिवृत्त झालेले निगम अधीक्षक हरीश दुबे यांनी व्यक्त केली. यावेळी हरीश दुबे यांनी मनपातील प्रदिर्घ सेवेदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.

Gold Rate
05 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,35,600/-
Gold 22 KT ₹ 1,26,100 /-
Silver/Kg ₹ 2,36,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ग्रंथालय अधीक्षक ते निगम अधीक्षक अशा ३८ वर्षाच्या सेवेमध्ये १४ महापौर, १५ उपमहापौर आणि ११ स्थायी समिती अध्यक्षांचा कार्यकाळ पाहिला. एवढ्याच मोठ्या संख्येत आयुक्तही मनपामध्ये सेवा देउन गेले. मात्र या ३८ वर्षाच्या सेवेमध्ये एकाही महापौर, उपमहापौर, अन्य पदाधिकारी व आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले नाही, असे निगम सचिव हरीश दुबे यांनी सांगितले.

निगम सचिव हरीश दुबे यांचे वडील नवलकिशोर दुबे हे मनपामध्ये सहायक शिक्षक म्हणून सेवेत होते. पुढे १९४० ला ते शिक्षणाधिकारी झाले. शिक्षणक्षेत्रामध्ये अनेक महत्वाचे कार्य नवलकिशोर दुबे यांनी केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मनपा कॉलनीतील एका मार्गाला ‘स्व.नवलकिशोर दुबे मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे पुत्र हरीश दुबे यांनाही मनपा सेवेचा वारसा आपसूकच मिळाला. बालपणी शहराचे प्रथम महापौर बॅरी.शेषराव वानखेडे यांच्या अंगाखांद्यावर खेळणा-या हरीश दुबे यांनी पुढे मनपामध्ये सेवा बजावताना तब्बल १४ महापौरांच्या कार्यकाळात आपला प्रशासकीय सहभाग दर्शविला. यावर्षी वडील नवलकिशोर दुबे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच महिन्यात मनपा सेवेतून सेवानिवृत्त होणे हा स्मरणीय योगायोग आहे, असेही निगम सचिव हरीश दुबे यांनी सांगितले.

लहानपणापासून ते निवृत्तीपर्यंत मनपाशी नाळ जुळली आहे. सेवाकाळात मनपात अनेक बदल पाहिले. सीएनसी कायदा हटवून मनपा कायदा महानगरपालिकेला लागू करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून नवीन सभा कामकाज नियमावली तयार करण्यात आली. प्रश्न उत्तरे, स्थगन प्रस्ताव आदी बाबी त्यात अंतर्भूत करण्यात आल्या. त्याचा फायदा आजही मनपा सभागृहामध्ये होत आहे. प्रभाग समिती गठीत करणे, विशेष समिती, परिवहन समितीचीही नियमावली तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याची आठवण निगम सचिव हरीश दुबे यांनी सांगितली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement