Published On : Wed, Apr 12th, 2017

पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी महापौरांनी घेतली आढावा बैठक

Advertisement


नागपूर
: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहे या पार्श्वभूमिवर महापौर नंदा जिचकार यांनी अग्निशमन बंबांची व्यवस्था, रसत्यातील दुरुस्ती, अतिक्रमण, झांडांची ट्रिमिंग, पाणी पुरवठा इत्यादी बाबत आढावा घेऊन उपस्थित सर्व अधिकाऱ्यांची जवाबदारी निश्चित केली. बुधवारी ता. १२ रोजी मनपाच्या मुख्य कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज, प्रशासकीय इमारती मधील सभा कक्ष् त मनपातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली . याच पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार या उद्या गुरुवार रोजी सकाळी १०.३० वाजता दीक्ष् भूमी व त्यानंतर मानकापूर येथे पाहणी दौरा करणार आहेत.

बैठकीत उपमहापौर दिपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष् संदीप जाधव, सत्ता पक्ष् उपनेते विक्की कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्ता पक्ष् नेते दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त रविंद्र कुंभारे, डॉ. रामनाथ सोनवणे, डॉ. आर.झेड सिद्धीकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, अधिक्ष् क अभियंता दिलीप जामगडे, शहर अभियंता मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (मेडीसीन) डॉ अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी, उद्यान अधिक्ष् क सुधीर माटे,अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, वाहतूक अभियंता महेश गुप्ता, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, , सहायक आयुक्त झोन क्र १ च्या सुवर्णा दखणे, झोन क्र २ चे महेश मोरोणे, झोन क्र ७ चे प्रकाश वराडे, झोन क्र.१० चे उप विभागीय अभियंता जी.टी.वासनिक, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक आयुक्त गांधीबाग झोनचे अशोक पाटील, यांत्रिकी अभियंता (हॉट मिक्स प्लांट) उज्वल लांजेवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी झोन क्र १,४, २ व १० मधील सर्व स्वच्छता बाबींबाबत महापौर नंदा जिचकार यांनी दिशानिर्देश जारी केले. मानकापूर येथे मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेट ठेवण्यात येतील. एक झोनल अधिकाऱ्याच्या अंतर्गत मनपाचे ४० कर्मचारी मानकापूर येथील कार्यक्रमासाठी सतत राबत आहे. मानकापूर येथे उन्हाचा तडाखा पाहता चालते-फिरते दवाखाने देखिल सज्ज ठेवण्याची सूचना महापौर यांनी केली. ५अग्निशमन बंब दीक्ष् भूमी, मानकापूर व कोराडी येथे सज्ज राहणार आहेत.

सोमवारी पालकमंत्री यांच्या हस्ते नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

सोमवार तारीख १७ एप्रिल रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते नदी स्वच्छता अभियानाचा शुभांरभ होणार असून नागनदी, पिवळी नदी व पोरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते होईल. पिवळी नदी नारा घाट येथे सकाळी ९.३० वाजता, नाग नदी संगम चाळ येथे सकाळी १० वाजता तर पोरा नदी येथे सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री स्वच्छता अभियानास सुरवात करतील. बैठकित पोकलेन मशीन, जेसीबी मशीन्स, काढण्यात येणारा गाळ इत्यादीविषयी विस्तृत माहिती, नद्या व सरोवरे विभागाचे उपअभियंता मोहम्मद ईजराईल यांनी सादर केली. बैठकीत महापौर नंदा जिचकार यांनी मनपा व सांसद जल व पर्यावरण रक्ष् ण योजना अंतर्गत नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची विस्तृत माहिती घेतली.