Published On : Fri, May 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांना आवाहन

Advertisement

नागपूर, ता. १: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा स्वच्छ, सुंदर व हरीत नागपूरचा शाश्वत विकास करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहू या, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्यालयातील हिरवळीवर आज ( ता.1 मे) महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, हनुमानगर झोनच्या सभापती श्रीमती ज्योती देवघरे, सतरंजीपुरा झोनच्या सभापती श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेविका श्रीमती योगिता तेलंग, नगरसेविका श्रीमती माधुरी फुलसुंगे (टेकाम), नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे, नगरसेवक श्री. अभिजीत झा, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, नगरसेवक श्री. राजेश्वर दिवटे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र. अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके,अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, श्रीमती लीना उपाध्ये, नगररचना विभागा उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, उपायुक्त श्री. निर्भय जैन, , उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वृक्षसंवर्धक श्री. अमोल चौरपगार, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, श्री. नरेंद्र बावनकर उपस्थित होते.

प्रारंभी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आहुती दिलेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली त्याचप्रमाणे जागतिक कामगार दिनानिमित्त सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Gold Rate
Apr 30- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,400 /-
Gold 22 KT ₹ 1,38,900 /-
Silver/Kg ₹ 2,38,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी श्रीमती ठाकरे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे महाराष्ट्राला जगात एक वेगळी ओळख मिळाली आहे. यामुळे या मातीचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहराचा विकासाचे विविध टप्पे गाठत आहे. त्यांचे राजकीय जीवन या नागपूर शहरातूनच सुरू झाले, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्प्द आहे. प्रारंभी आयुक्त डॉ. विपीन यांनी महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांनी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांचे स्वागत केले. सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement