Published On : Thu, Aug 27th, 2020

आजपासून नागरिकांची ‘ऑक्सीजन लेवल’ चाचणी

– नगरसेवकांना सहभागी होण्याचे महापौरांचे आवाहन

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहे त्यांच्या ‘ऑक्सीजन लेवल’ची चाचणी करण्यात येणार आहे. नागपुरातील सर्व २८ पोलिस ठाण्यांमधून शुक्रवार दि. २८ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता नगरसेवक आणि पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या कार्यात विविध स्वयंसेवी संस्था सुध्दा सहभागी होणार आहे.

Advertisement

हा निर्णय विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ.भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी श्री. रवींन्द्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांच्या संयुक्त बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मृत्यू संख्यासुद्धा झपाटयाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते आणि रुग्णांची प्रकृती बिघडते. म्हणून रुग्णांच्या ऑक्सीजन पातळीची तपासणी करण्यात येणार आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस कर्मचारी या मोहिमेत भाग घेणार आहेत. या मोहिमेत मनपा कर्मचारी व एन.जी.ओ.चे प्रतिनिधी पोलिसांसोबत नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहे.

Advertisement

महापौर श्री. संदीप जोशी यांनी मोहिमेला शुभेच्छा देताना नगरसेवकांकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे. त्यांनी सांगितले की, ऑक्सीजन लेवलची तपासणी करुन नागरिकांची प्राणहानी थांबिण्यात यश येऊ शकते. शुक्रवारपासून ही मोहिम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठया प्रमाणात उपक्रमात सहभागी होऊन कोरोनाला हददपार करण्यात प्रशासनाला मदत करावी. नगरसेवकांनी आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement