Published On : Sun, Sep 26th, 2021

मंगळवारी धोबीघाट शेड दुरुस्ती कार्याचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर : मंगळवारी धोबीघाट नई बस्ती व गड्डीगोदाम वॉर्डमधील धोबी घाट शेडच्या दुरुस्ती कार्याचे शनिवारी (ता.२५) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंजित सिंग ठाकूर, मुकेश गेडाम, मोहनीत दुबे, भारती निकोसे, रूपेश मुदलियार, किरण हिवराळे, राजेश समुंद्रे, विशाल कांबळे, रिषभ लोखंडे आदी उपस्थित होते.

मागील अनेक महिन्यांपासून परिसरामध्ये धोबीघाट शेडची मागणी करण्यात येत होती. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांना माहिती देण्यात आली. महापौरांनी परिसरात शेडच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत शेडच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला. महापौरांनी तातडीने गांभीर्याने दखल घेत शेडच्या निर्मितीला मूर्त स्वरूप दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी महापौरांचे अभिनंदन केले व आभार मानले.