Published On : Thu, Jul 23rd, 2020

कामठी चे नगराध्यक्ष आढळले कोरोना पॉजिटिव्ह

– दुसऱ्या दिवशी कोरोनाबधितांची संख्या 27

कामठी : -कामठी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढीवर असून काल एकाच दिवशी 27 रुग्ण कोरोना बाधित आढळल्या नंतर आज सुद्धा आढळलेल्या कोरोना पोजिटिव्ह ची संख्या ही 27 ठरली आहे.ज्यामध्ये कामठी शहराचे नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत हे सुद्धा कोरोना पोजिटिव्ह आढळले तर नगराध्यक्ष सतत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कामठी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने उपस्थित राहल्याने समस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सुदधा प्रदूर्भावाचा धोका घोंगावत आहे.

आज आलेल्या कोरोना पोजिटिव्ह अहवाला नुसार दिवसभरात कामठी तालुक्यात एकूण 27 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळले असून आजपावेतो कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 258 आहे यामध्ये 65 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत यानुसार 189 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

यानुसार आज कामठी तालुक्यात आढळलेल्या एकूण 27 कोरोना पोजिटिव्ह रुग्णामध्ये कादरझेंडा 01,तुंमडीपुरा 04,भोईलाईन 01, इमलिबाग 1, खैरी 01, मोदीपडाव 1, छत्रपती नगर 01,कांटी ओली 01,बजरंग पार्क 01,येरखेडा 05, सोनार ओली 01,न्यागोदाम 01,कोळसा टाल 01,हरदास नगर 01, दाल ओली 01, इमलिबाग 03, नागसेन नगर 01 रुग्णाचा समावेश आहे.या सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनटाईन करण्यात आले आहे.

संदीप कांबळे कामठी