Published On : Sat, Nov 4th, 2017

कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये महापौर नंदा जिचकार सहभागी होणार

Advertisement

नागपूर : नागरी नेक्सस प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक ॲण्ड सोशल कमिशन फॉर एशिया ॲण्ड द पॅसिफिक (यूएनईएससीएपी) ने महापौर नंदा जिचकार यांना श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये आमंत्रित केले आहे. त्यासाठी त्या शुक्रवारी कोलंबोला रवाना होत आहेत.

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह साऊथ एशिया (आयसीएलईआय) आणि प्रादेशिक जीआयझेड शहरी नेक्सससह २०१६ पासून नागपूरमध्ये ‘आशियायी शहरी नेटवर्क्समधील एकात्मिक संसाधन व्यवस्थापन’ या प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. ‘शहरी नेक्सस’ या प्रकल्पाचा उद्देश नागपूरमध्ये नागरी विकास नियोजन प्रक्रियेमध्ये एकीकृत दृष्टीकोन अंवलंबिणे व प्रोत्साहन देणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेषत: पाणी, ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. महापौर नंदा जिचकार ह्या कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करणार असून शहराच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलतील.

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘सिटी नेट काँग्रेस’चे श्रीलंकेतील कोलंबो येथे ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध देशातील शहरांमधील सदस्य, सहयोगी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पीअर-टू-पीअर लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे शहरातील महापौर, नागरी नेते आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ एकत्र येऊन हवामान बदल, आपत्ती जोखीम कमी कशी करता येईल आणि इतर शहरी विकास समस्यांवर चर्चा करतील.

Advertisement
Advertisement
Advertisement