Published On : Wed, Nov 28th, 2018

महात्मा जोतिबा फुले स्मृति दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : महात्मा जोतिबा फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिना निमित्त महापौर नंदा जिचकार व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी अभिवादन केले. नझुल कॉलनी बेझनबाग येथील हर्षवर्धन बौद्ध विहारात महापौर नंदा जिचकार व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

यावेळी जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, मंगळवारी झोन सभापती संगिता गिऱ्हे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, किशोर जिचकार, अपर आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त हरिश राऊत, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता कल्पना मेश्राम, कमलेश चव्‍हाण, विद्युत अभियंता एन.बी. सालोडकर, आरोग्य झोन अधिकारी महेश बोकारे, ओसीडब्ल्यूचे रत्नाकर पंचभाई, भन्ते नागा प्रकाश, दलित कल्याण महिला मंडळाच्या अध्यक्षा चंदा मेश्राम, सचिव सरला बोरकर, रिता बर्मन, शालिनी मडके, कविता वैद्य, अनिता मडके, वेणू टेंभूर्णे, सुधा मेश्राम, मिना मेश्राम, रंजना सरदार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement