| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 8th, 2021

  प्रभाग ३० मध्ये महापौरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

  नागपूर : प्रभाग ३० (अ) मध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात भविष्य निर्वाह निधी भवन कम्युनिटी हॉल रामबाग, शितला माता चौक, भांडे प्लॉट, उमरेड रोड येथे करण्यात आली. या मोहिमेचे शुभारंभ महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी केले.

  महापौरांनी आपल्या भाषणात झोपडपटटी, स्लम वस्ती व अन्य नागरिकांचा जास्तीत-जास्त लसीकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रामुख्याने क्षेत्रीय भविष्य निर्वाह आयुक्त श्री. देवेन्द्र सोनटक्के व सहाय्यक आयुक्त श्री.मिलींद देवुळकर, नगरसेविका तथा समाजकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नेहरुनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, नगरसेवविका रीता मुळे, दक्षिण नागपूरचे श्री. देवेन्द्र दस्तुरे उपस्थित होते. 1

  लसीकरण मोहिम नगरसेवक श्री. नागेश गोविंदराव सहारे यांच्या प्रयत्नानी प्रारंभ झाली आहे. यावेळी प्रभाग अध्यक्ष नितेश समर्थ, छोटेखान साहाब, राजेश फुटाणे, सचिन चलपे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145