Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौरांच्या हस्ते ‘शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२६-२७’ चे विमोचन

Advertisement

नागपूर,: मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२६-२७’ या पुस्तकाचे आज (ता.८) महापौर कक्षात मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, अग्निशमन विशेष समितीच्या सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे, नगरसेवक श्री. विजय( पिंटू) झलके, श्री. लखन येरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते ,उप.अग्निशमन अधिकारी श्री. सुनील डोकरे, श्री. देवानंद शामकुळे, श्री. सुरेश किनेकर, श्री दिलीप चव्हाण, श्री. रुपेश मानके, प्रमुख अग्निशमन विमोचक श्री. भरत पालवे, वरिष्ठ लिपिक श्री. अरुण भोपे यांच्यासह इतर उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अग्निशमन विभागाने हा सविस्तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये नागपूर शहराची माहिती, अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होणारी ठिकाणे, पाणी साचणारे व पाणी शिरणारे भाग, झोपडपट्ट्यांची माहिती, अग्निशमन केंद्रनिहाय संवेदनशील स्थळे, घटना प्रतिसाद प्रणाली (IRS), विविध विभागांचे कर्तव्य व दायित्व, प्रमाणित कार्यपद्धती (SOP), मागील वर्षातील घटनांचा आढावा, उपलब्ध यंत्रसामग्री, वाहने, मनुष्यबळ, झोननिहाय नियोजन, महत्त्वाच्या संपर्क क्रमांकांसह जनजागृतीपर माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच उष्माघात, अतिवृष्टी, वीज पडणे, सर्पदंश, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती बाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक संपर्क व्यवस्था याबाबतही या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी, त्वरित प्रतिसाद आणि प्रभावी समन्वय यावर भर देत नागपूर महानगरपालिका यंदाही मान्सून काळात सज्ज आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.