Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आमदार विकास ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश; नागपुरात कमलेश चौधरींच्या बांधकामावरील स्थगिती हटली

Advertisement

Har Ghar Tiranga'; MLA Vikas ThakreVikas-.jpg

नागपूर : कथित भूमाफिया कमलेश चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या लॉन व दोन निवासी घरांवरील पाडकामासंदर्भात महाराष्ट्र शासनाने पूर्वी दिलेली स्थगिती मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला संबंधित बांधकामांवर पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकरणात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, अन्याय निवारण मंचाचे अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे तसेच संबंधित जमिनीचे मालक असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा संदर्भ ७ ऑगस्ट २०२३ रोजी नगर विकास विभागाने नागपूर महानगरपालिकेला पाठविलेल्या पत्राशी जोडला जातो.

त्यावेळी संबंधित जागेबाबत दाखल करण्यात आलेल्या अपीलावर सुनावणी होईपर्यंत महापालिकेच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच न्यायालयाचे कोणतेही आदेश असल्यास त्यांचे पालन करून पुढील कार्यवाही करण्यास सांगण्यात आले होते.

Advertisement

आता शासनाने ती स्थगिती उठवल्याने संबंधित बांधकामांवर महापालिकेकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.