महापौरांनी केला राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त नगरुरकर यांचा सत्कार
नागपूर,: नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी (१ मार्च) रोजी महापौर कक्षात राष्ट्रपति पोलिस पदकसाठी निवड झालेले श्री. राजेश नगरुरकर यांचा मनपाचा दुपटटा, तुलसीचे रोपटे देऊन सत्कार केला.
या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, ना.सु.प्र.चे माजी विश्वस्त श्री. भूषण शिंगणे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस आदी उपस्थित होते.
मुळचे नागपूरचे श्री. राजेश नगरुरकर हे सध्या राखीव पोलिस उपनिरीक्षक पदावर पोलिस मुख्यालय बुलढाणा येथे कार्यरत आहेत. महापौरांनी त्यांना पुढील कारर्कीदीसाठी शुभेच्छा दिल्यात.