Published On : Thu, Mar 11th, 2021

महापौरांनी केली नगररचना विभागाची आकस्मिक पाहणी

दिरंगाई करणा-या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील कार्यपध्दतीची दिवसेंदिवस प्राप्त होत असलेल्या तक्रारीची दखल घेत त्याची शहानिशा करण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (१० मार्च) रोजी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तिस-या माळयावर स्थित नगररचना विभागाची आकस्मिक पाहणी केली. त्यांच्या समवेत कर आकारणी समिती उपसभापती श्री. सुनिल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा व उपायुक्त श्री. निर्भय जैन उपस्थित होते. यावेळी महापौरांनी कामात दिरंगाई करणा-या अभियंत्यावर कारवाई करण्याचे निर्देश ही दिलेत.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौरांच्या आकस्मिक पाहणीची माहिती मिळताच नगररचना विभागात खळबळ माजली. महापौरांनी विभागाचे मुख्य व्दार बंद करण्याचे निर्देश दिले आणि बाहेर जाण्यावर पाबंदी लावली. महापौरांनी नगररचना विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंताकडे मंजूरीसाठी विचाराधीन नकाशाबददल माहिती घेतली. मनपाकडे सध्या गुंठेवारी क्षेत्राचे नकाशे सुध्दा मंजूरीसाठी येतात परंतु नागरिकांची तक्रार आहे की सहा-आठ महिन्यापर्यंत नकाशे मंजूर होत नाही. महापौरांना अशी ही तक्रार मिळाली होती की दलालांचा रॅकेट नगररचना विभागात कार्यरत आहे. नकाशा मंजूरीसाठी नागरिकांना दलालांचे फोन येतात.

महापौरांनी या सगळया तक्रारींची सखोल तपासणी करण्यासाठी आकस्मिक पाहणी केली. महापौरांनी बघीतले की नकाशा मंजूरीच्या प्रक्रियेत वेळ लागत आहे. नागपूर सुधार प्रन्यास आणि मनपाच्या कामात सुसुत्रता आणण्याची गरज आहे. तसेच कनिष्ठ अभियंतांकडे रेकार्ड बरोबर ठेवला जात नाही. कनिष्ठ अभियंता आप-आपल्या पध्दतीने रेकार्ड ठेवतात त्याच्यात सुसुत्रता ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रत्येक अभियंतांकडे ७०० – ८०० नकाशे प्रलंबित आहेत त्याचा निपटारा ही लवकरात-लवकर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महापौरांनी सांगितले की, मागच्या वर्षी नगररचना विभागाकडून रु १९३ कोटीची आय प्राप्त झाली होती. यावर्षी फक्त रु ४० कोटीची आय विभागाकडून झाली आहे. नगररचना विभागाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करुन नागरिकांना मोठा दिलासा देऊ शकतात तसेच मनपाची आय सुध्दा वाढू शकते.

Advertisement
Advertisement