कामठी: कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या उमरी येथील रहिवासी एका विवाहित महिलेचा राहत्या घरातील ओल्या भिंतीला आलेल्या वोद्दुत करंट चा स्पर्श झाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजता घडली असून या मृतक महिलेचे नाव अश्विनी शेखर चाचेरे वय 27 वर्षे रा उमरी ता.कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यात रिमझिम पावसाची सरी सुरू असून मृतक महिलेच्या घराजवळील असलेल्या विद्दूत खांबाचा भिंतीला करंट आला दरम्यान ही महिला दैनंदिन रित्या सकाळी उठून घरकामाला लागली असता अचानक भिंतिला झालेल्या स्पर्शाने बसलेल्या जबर धक्क्याने खाली पडलेल्या स्थितीत महिलेला उपचारार्थ नजीकच्या इस्पितळात हलविण्यात आले मात्र तोवर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले होते. मृतक महिलेच्या पाठीमागे पती, सासू, सासरा, तसेच एकुलता एक दीड वर्षाचा चिमुकला मुलगा आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या मार्गदर्शनार्थ तलाठी,मंडळ अधिकाऱ्यानि घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी