| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Mar 30th, 2017
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडा : महापौर

  नागपूर: आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडा, तसेच दिलेले काम वेळेत पूर्ण करा आणि शोभायात्रेचे आयोजन निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीत्या पार पाडा अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या.

  श्रीरामनवमीनिमित्त नागपुरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, नगरसेवक मनोज साबळे, सरला नायक, संजय बालपांडे आदी उपस्थित होते.

  प्रथम महापौरांनी शोभायात्रा व्यवस्थेसंबंधीचा आढावा घेतला. शोभायात्रेच्या मार्गात विद्युत प्रकाश हा अपुरा असतो. त्यामुळे यावर्षी जादा लाईटची व्यवस्था करण्यात यावी,अशा सूचना त्यांनी विद्युत विभागाला दिल्या. प्रसादाच्या ठिकाणी कचरा होत असल्याने त्याठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिलेत. शोभायात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी ओसीडब्ल्यूने खणलेले खड्डे त्वरित बुजवावे व रखडलेली कामे पूर्ण करावी, असे आदेश महापौरांनी ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांना दिलेत. ठिकठिकाणी फिरत्याटॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना महापौरांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्यात.

  शोभायात्रा आयोजन समितीचे सदस्य नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी शोभायात्रेदरम्यान सिटी बसेसची व्यवस्था कशी राहील, याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, पूर्व नागपूरकडे जाणाऱ्या बसेसचे स्थानक आयचित मंदिर येथे करण्यात आले आहे, दक्षिण नागपूर कडे जाणाऱ्या बसेसचे स्थानक आग्याराम देवी मंदिर येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम नागपूरकडे जाणाऱ्या बसेसची व्यवस्था व्हेरायटी चौक येथे करण्यात आली आहे.

  यावेळी कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, तसेच ओसीडब्ल्यूचे अधिकारी, शोभायात्रा संचालन समितीचे पुनीत पोद्दार, शांतीलाल शर्मा, संतोष काबरा, श्रीकांत आगलावे, भूषण गुप्ता आदी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145