Published On : Fri, Feb 21st, 2020

जी. एस महाविद्यालयात मातृभाषा दिवसाचे आयोजन

नागपूर : जी. एस महाविद्यालयात दिनॉक 20 फेब्रुवारी, 2020 रोजी मातृभाषा दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक भारत श्रेष्ट भारत उपक्रमाचे नोडल ऑफिसर डॉ. पराग पराडकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांज्या या भारतात बंधबभाव नित्य वसू दे या गीताने करण्यात आली.

महाविद्यालयातील रोजाष कुडवे, चिनमयी डोंगरे, आदर्ष कोलमकर, अमेय पिपलापुरे अर्थव पांडे या विद्यार्थानी म्राटी भावागीत सादर केले. डॉं अमृता इंदूरकर यांचे मातृभाषेचे महत्व या विषयावर स्नातकोत्तर मराठी विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महराज नागपूर विद्यापीठ नागपूर सहाय्यक प्राध्यापक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात मातृभाषेचे महत्व विघार्थ्याना पटवून सांगितले. अध्यक्षिय भाषणात प्रा. स्वाती कठाळे यांनी भाषेचा सन्मान करणे कसे आवष्यक आहे ते विघार्थ्याना सांगितले.

कार्यक्रमाला आय. क्यू. ए. सी. कन्व्हेनर प्रा. प्रविण याद्व, प्रा. आकाष जैन, प्रा. पल्लवी श्रीवास्तव, डॉ. षुभांगी मोरे, डॉ. स्वाती धर्मधिकारी मोठया संख्येने विघार्थी आणि षिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मराठी ग्रंथाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाच्या संयोजिका डॉ. देवयानी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्षन डॉ. सोनाली गादेकर यांनी केले. महाविघालयाचे प्राचार्य डॉ. एन. वाय. खंडाईत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचा षेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.