Published On : Thu, Jun 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील एमपी बसस्थानकावर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; मोठा अनर्थ टळला

Advertisement

नागपूर : शहरातील एमपी बसस्थानकावर गुरुवारी सायंकाळी उभी असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने आग लागली तेव्हा बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजताच्या सुमारास एमपी बसस्थानकावर उभी असलेल्या अमीना ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि संपूर्ण बसने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही मिनिटांत बसचा मोठा भाग जळून खाक झाला.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच आग इतर वाहनांपर्यंत पोहोचू नये म्हणून परिसरातील वाहने तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली.

संबंधित बस नागपूर–मोखाड–उमरानाला मार्गावर धावते. या बसचे नियोजित प्रस्थान सायंकाळी ५.१५ वाजता असल्याने आग लागली तेव्हा बसमध्ये कोणताही प्रवासी नव्हता. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

Advertisement

अग्निशमन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, बसच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही काळ एमपी बसस्थानक परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges