Published On : Wed, Nov 18th, 2020

बाटलीबंद पाण्यासाठी गरीबांचे जनाहार

Advertisement

– दिड वर्षांपासून प्रवाशांची वानवा

नागपूर: प्रवासादरम्यान बाटलीबंद पाण्याला मोठया प्रमाणात मागणी असली तरी त्या पाण्याचा वापर गरीब आणि सामान्य प्रवाशांकडून टाळला जातो. नळाचे थंड पाण्यालाच त्यांची पसंती असते. अलिकडे गरीब प्रवाशांसाठी राखीव आणि प्रसिध्द असलेल्या जनाहारमध्ये गरीबांचे खाद्य पदार्थ तर दुरापास्त झाले. मात्र, त्याच जागेचा बाटलीबंदपाणी साठवणुकीसाठी उपयोग केला जात असल्याची धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

गरीब आणि सामान्य प्रवाशांना अंत्यत वाजवी दरात गुणवत्तापूर्ण नास्ता आणि भोजन मिळावे अशी व्यवस्था भारतीय रेल्वेने जनाहार अंतर्गत केली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाèया सामान्य प्रवाशांसाठी ही सुविधा फारच उपयुक्त ठरली आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावरील जनाहारचे पूर्वीपासूनच आगळे वेगळे महत्त्व राहिले आहे. नाममात्र दरात मिळणाèया खाद्य पदार्थासोबत केवळ पंधरा रुपयांत पुरी-भाजीचे संपूर्ण जेवण प्रवाशांना मिळते. ही जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपविण्यात आल्यानंतर खाद्य पदार्थांची गुणवत्ता आणि शुल्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. येथून खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री होत असल्याने वाणिज्य विभागाने कारवाई सुध्दा केली आहे. शिवाय गरीब प्रवाशांकडून मोठी मागणी असूनही जनता खाना उपलब्ध करून दिले जात नसल्याच्याही तक्रारीही पुढे आल्या. काही महिन्यापुर्वी निकृष्ठ दर्जाचे अन्न उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून दंडही करण्यात आला होता.

त्यानंतर कंत्राटच संपल्याने १ जुलैपासून जनाहारला कुलूप लावण्यात आले. निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात आहे. अलीकडे तर बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या साठविण्यासाठी जनाहारच्या जागेचा उपयोग होऊ लागला आहे. यामुळे गरीब प्रवाशांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे जनाहार सुरू होण्याची अपेक्षा असताना त्याच ठीकाणी गोडावून सुरू झाले. बाटलीबंद पाणी ठेवण्यासाठी निवीदा काढली होती का? मुख्यालयाकडून तशी परवानगी घेण्यात आली का? किराया ठरविण्यात आला का? हे सगळ परस्पर केल्या जात आहे, आदी प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.

पाकीटबंद स्वत जेवण उपलब्ध व्हावे
कोरोनाचे संकट काहिसे ओसरले असून टप्प्या टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविली जात आहे. त्यातून कामानिमित्त प्रवास करणाèया मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुविधेसाठी पाकीटबंद स्वत जेवण उपलब्ध व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आयआरसीटीसीचे दुर्लक्ष होत असल्याने जनआहार केंद्र अद्याप सुरू झाले नाही. ते कधी सुरू होईल आणि गरीब प्रवाशांना स्वस्त दरात कधी भोजन मिळेल, या प्रतिक्षेत प्रवासी आहेत.