कन्हान : – ढिवर समाज सेवा संघटना कन्हान व्दारे मटम-मच्छी मॉकेट च्या बाजुला असलेल्या मैदानात मासोळी विक्रेत्याची अंतरावर दुकानाची आखणी व दुकानाची व्यवस्था करून त्यांना सोश ल डिस्टसिंगचे महत्व समाजावुन मॉस वितरण करून समाज बांधव व नागरि कांच्या जिवनाश्यक सोयीचे कार्य केले.
कोरोना विषाणुच्या महामारी संकटात संपुर्ण देशात लागु टाळेबंदी, संचारबंदी चौथ्या टप्यात नागरिकांच्या मुलभुत जि वनाश्यक गरजा पुर्ण होण्याच्या दुष्टिने काही शिथीलता देण्यात आल्याने कन्हा न – पिपरी परिसरातील ढिवर समाजाती ल समाजबांधव नदी, तलावातुन मासोळ या पकडुन त्या विकुन आपले व परिवा राचा उदरनिर्वाह करतात.
या दोन महि न्याच्या काळात ढिवर समाज बांधवाची अत्यंत दैन्यअवस्थेचा गांर्भियाने विचार करून ढिवर समाज सेवा संघटना अघ्य क्ष सुतेश मारबते हयांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याशी विचारविमर्स करून रविवार (दि.२४) ला मटम-मच्छी मॉकेट च्या बाजुला असले ल्या मैदानात मासोळी विक्रेत्याची अंतरावर दुकानाची आखणी व दुकानाची व्यवस्था करून त्यांना सोशल डिस्टसिंगचे महत्व स्पष्ट करून शुक्रवार ला दुकाने बंद ठेऊन दर रोज सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे समजावुन मॉस वितरण केले.
या प्रसंगी न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, ढिवर समाज सेवा संघटना अघ्यक्ष सुतेश मारबते, सचिव मनोज मेश्राम, कोषाध्यक्ष श्रीकां त मानकर, गितेश मोहने, मंगल शेंडे, अ शोक मेश्राम, प्रशांत मसार, प्रदीप बावने प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जिवन रक्षा पथकाचे सचिन खंडाते, राजु मारबते, बंडु मारबते, उमेश मेश्राम, विजय गोंडाणे, अरूण वाघधरे, रामदास मेश्राम, संपत गोडाळे आदीने परिश्रम घेतले.
