नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 37 वर्षीय महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांची 2009 पासून ओळख होती. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आरोपी चंद्रशेखर रमेश किरपाणे याने लग्नाचे आश्वासन देत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच, संबंधांच्या काळात काढलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर दबाव टाकला. अखेरीस लग्नास नकार दिल्यानंतर पीडितेने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे कळमना पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर रमेश किरपाणे याच्याविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत.




