Published On : Fri, Mar 27th, 2020

सोशल मीडियावर अफवांचे बाजार

रामटेक पोलिसांची कारवाही लॉक डाउन तोड़नारे व सोशल मीडयाद्वारे अफवा गैरसमज पसरवले तर होनार कठोर कारवाही – उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर

रामटेक : आज देश आणि पूर्ण जग कोरोना मुळे त्रस्त असून देशाची परिस्थिती खूप बिकट झाली आहे.अशा परिस्थितीत अफवा फैलवनाऱ्यांची संख्या वाढत आहे.अशीच एक घटना रामटेक येथे घडली आहे. राज्यात कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत त्याच प्रमाणे अधिसूचना काढून कोणत्याही व्यक्तीस ,संस्था ,संघटना कोव्हिड-19 याबाबत कोणत्याही प्रकारची
अफवा ,अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पसरविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आयुक्त आरोग्य सेवा पुणे व संचालक वैदकिय शिक्षण व संशोधन मुंबई विभागीय आयुक्त जिल्हाधकारी यांचे मार्फत अनाधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल.

Advertisement

रामटेक येथील निलेश भाटी या 33 वर्षीय व्यक्तीने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकली की ,”रामटेक की जनता बाहर निकल सकती है . जाणकारो के अनुसार ऐसे कहा गया है की, 25/26 डिग्री मे कोरोना नहि रहेगा” असा मजकूर अधिकृत अधिकार नसातंनाही सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे फिर्यादी यांनी शासनातर्फे दिलेल्या तोंडी रीपोर्टवरून सदर गुन्हा दाखल केला.

Advertisement

सोशल मीडयाद्वारे जर कोणीही अफवा पसरवली तर त्यावर कारवाही करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर व पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले असून वैश्विक आपत्तीच्या काळात कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून सामाजिक व मानसिक आरोग्य धोक्यात आणू नका असे आवाहन केले आहे.

तसेच सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा गैरसमज पसरविणारे मॅसेज असतील तर त्याची नागरिकांनी सम्पूर्ण शहानिशा करून घ्यावी असेही सूचित केले आहे. लॉक डाउन तोड़नारे वर कठोर कारवाई करन्यात येनार असल्याचे उपविभागिय अधिकारी नयन आलूरकर यानि सांगितले

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement