Published On : Thu, Jan 30th, 2020

माँ जगदंबा सेवा समिती व्दारे हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

कन्हान : – माँ जगदंबा सेवा समिती दुर्गा मंदिर राम नगर कन्हान व्दारे नवनिर्वाचि त नगराध्यक्षा व नगरसेविका यांंच्या सत्कारासह महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.

दरवर्षी प्रमाने माँ जगदंबा सेवा समिती व माँ जगदंबा महिला मंडळ द्वारा मकर संक्रांतीच्या निमित्त्याने दुर्गा मंदिर राम नगर कन्हान येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जवळपास ३०० महिलांना हळदी-कुंकू व वानांचे वितरण करण्यांत आले,

Advertisement

प्रसंगी नगरपरिषद कन्हानच्या नवनिर्वा चित नगराअध्यक्षा सौ करुणा आष्टनकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच अहिल्याबाई होळकर पतसंस्थेच्या उपाध्यक्षा स्वाती पाठक, नगर सेविका वर्षा लोंढे, सुषमा चोपकर, राखी परते, वैशाली शेन्द्रे यांचा शुध्दा सत्कार करण्या त आला. याप्रसंगी माऊली महिला भजन मंडळ, राधे राधे महिला भजन मंडळ, संत मुक्ताबाई भजन मंडळच्या सर्व सदस्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Advertisement

कार्यक्रमाच्या आयोजिका लक्ष्मी लाडे कर, वर्षा शिंगाडे, ज्योती राठी, लता नानोटे, आशा छलीया, रंजना माहूरकर, वैशाली भांदककर, अर्चना नानोटे, वर्षा रोकडे, रत्ना विश्वकर्मा, नम्रता नाईक यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू व वान दिले. परिसरातील महिला मोठ्या संख्ये ने उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement