Published On : Thu, Jan 30th, 2020

‘‘एकत्रीत राहुन आपली स्‍वतंत्रता अबाधित ठेवा’’-प्राचार्या, श्रीमती पोर्णिमा मेश्राम

नागपूर: भारतीय संस्‍कृती विविध धर्म, भाषा, जात यानी नटलेली आहे आणि या विविधतेत पण आपण एक आहोत, सर्वप्रथम आपण भारतीय आहोत. सर्वांनी मतभेद दूर करून दुस-याच्‍या संस्‍कृतीचा, धर्माचा, भाषेचा आदर करावा असे प्रतिपादन नगर परिषद माध्‍यमिक व कनिष्‍ठ महाविद्यालय कळमेश्‍वरच्‍या प्राचार्या श्रीमती पोर्णिमा मेश्राम यांनी ‘’ एक भारत-श्रेष्‍ठ भारत’’ विषयावर आयोजित कार्यक्रमात व्‍यक्‍त केले.

भारत सरकारच्‍या सूचना आणि प्रसारण मंत्रालया अन्‍तर्गत कार्यरत क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरोच्‍यावतीने कळमेश्‍वर येथील नगर परिषद माध्‍यमिक व कनिष्‍ठ महाविद्यालयात ‘’एक भारत-श्रेष्ठ भारत’’ या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्री बाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण व द्विप प्रज्‍वलन करून करण्‍यात आले.

कार्यक्रमांतर्गत शाळेत रांगोळी स्‍पर्धा , प्रश्‍न मंजुषाचे आयोजन करून विजेत्‍यांना ब्यूरोतर्फे बक्षिसे देऊन सम्‍मानित करण्‍यात आले. यावेळी प्राध्‍यापक के.यु. धोटे आणि ए.व्‍ही राठोड यांनी ‘’एक भारत-श्रेष्ठ भारत’’ विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रितीछाया गोखे, प्रामुख्‍याने उपस्‍थित होत्‍या . या वेळी विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकगण उपस्‍थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ब्‍यूरोच्‍या सहायक संचालिका, मीना जेटली यांनी केले. सूत्र संचालन या शाळेच्‍या शिक्षीका, प्रिती जोध यांनी केले तर आभार लंगडे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍या करीता क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरोचे संजय तिवारी आणि संजीवनी निमखेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.