कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहण्यास येणारे लाखोंच्या संख्येतील अनुयायी दिक्षाभूमीवरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात
याच पाश्वरभूमीवर यावर्षीसुद्धा 4 लाख पेक्षा अधिक अनुयायी ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येणार असल्याने या अनुयांयाच्या सुरक्षित ते संदर्भात पोलीस विभागाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिले.तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला बस ने प्रवास करणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग जवळील मार्गच्या दुरावस्थेत सुव्यवस्था करीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे निर्देश दिले. दरम्यान ड्रॅगन पॅलेस टेम्पल तसेच या परिसरातील विपश्यना केंद्र व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रातील परिसराची पाहणी करीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी कामठी चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजरतन बन्सोड, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, वाहतूक पोलीस निरीक्षक रोशन यादव, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक रामकीरण पांडे, गुप्त विभागाचे मयूर बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते
संदीप कांबळे कामठी
