Published On : Tue, Jan 7th, 2020

आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्स सर्व संकटांवर मात करून यश मिळवण्यासाठी करते सहाय्य

Advertisement

नागपूर: संघर्षावर मात करणाऱ्या व यश मिळवणाऱ्या लोकांची अनेक प्रेरणादायी उदाहरणे आहेत. यातील एक यशोगाथा स्नेहा मेश्राम या नागपूरमधील 19 वर्षीय साहसी तरुणीचीही आहे. स्नेहा अनाथ आहे. ती आणि तिची बहीण केवळ चार व पाच वर्षांच्या असताना तिच्या पालकांनी तिला व तिच्या बहिणीला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले. या दोघींना नागपूरमधील राहुल बालसदन या अनाथालयाने दत्तक घेतले.

बालक 18 वर्षांचे झाले की त्याला अनाथाश्रमातून बाहेर पडावे लागते आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे लागते, असा अनाथाश्रमाचा नियम आहे. म्हणून, स्नेहा 18 वर्षांची झाल्यावर तिला अनाथाश्रमाच्या नियमानुसार अनाथाश्रम सोडण्यास सांगण्यात आले.

तिचे कोणीच नव्हते किंवा तिला आसरा देऊ शकेल अशा कोणालाही ती ओळखत नसल्याने या घटनेने स्नेहा खचून गेली व तिने सर्व आशा सोडून दिल्या. ती कमावतही नव्हती. दुसरीकडे सोय होईपर्यंत काही दिवस अनाथाश्रमात राहण्याची परवानगी मिळेल का, असे तिने तेथील अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनी यासाठी तयारी दाखवली, मात्र तिला अनाथाश्रमामध्ये विविध जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील, अशी अट घातली, जसे दैनंदिन कामे करणे, तेथील अन्य लहान मुलांची देखभाल करणे.

परंतु, तिला एक दिवस तेथून बाहेर पडायचे होते आणि स्वतःसाठी व बहिणीसाठी सुरक्षित भविष्य साध्य करायचे होते.

एके दिवशी तिला नागपूरमधील आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्सबद्दल कळले. ती या सेंटरमध्ये जाऊन आली. अॅकॅडमीतील वातावरण पाहून ती अतिशय प्रेरित झाली. एक दिवस, फॅकल्टी मेंबरने तिचे समुपदेशन केले. त्यावरून, आपल्याला हेच हवे होते, असे तिला वाटले. हे प्रशिक्षण घेण्यासाठी तिला रुपयाही खर्च करावा लागणार नव्हता आणि तिला अॅकॅडमीमधूनच नोकरी मिळणार होती, त्यामुळे ती फार खूष होती.

ती नियमितपणे अॅकॅडमीमध्ये येत असे, परंतु तिला अनाथाश्रमामध्ये बरीच कामे करावी लागत असल्याने क्लाससाठी वेळेवर यायला जमत नसे. ही परिस्थिती तिनेअॅकॅडमीला सांगितली आणिअॅकॅडमीने तिला प्रचंड पाठिंबा दिला. तिला अॅकॅडमीमध्ये जीवनकौशल्ये, ग्रूमिंग व स्वच्छता याविषयी शिकता आले. तिला सॅनिटरी स्वच्छतेविषयी माहिती नव्हती. परंतु अॅकॅडमीतील प्रशिक्षकांनी याविषयी जागृती केली आणि ही माहिती अनाथाश्रमातील इतरांनाही देण्यास सांगितले.

ज्यांना आई-वडील नसतात त्यांच्यासाठी देव असतो आणि देव तुमच्या मदतीला धावून येऊ शकत नसल्याने त्याने तिच्यासारख्या लोकांचे आयुष्य घडवण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्समध्ये तिला जी भेटली ती सुंदर माणसे बनवली.ती सांगते, “मला माझ्या बहिणीला घेऊन नेहमीच नागपूरच्या बाहेर पडायचे होते आणि अॅकॅडमीमुळे मला वडोदरा येथील कॉजेंट ई सर्व्हिसेसमध्ये जायची संधी मिळाली.माझ्या आयुष्याला आकार दिल्याबद्दल मी आयसीआयसीआय अॅकॅडमीची अतिशय आभारी आहे.”तिची बहीण नागपूर येथे नर्सिंग कोर्स करत आहे. तिचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तीही वडोदराला येणार आहे.

2008 मध्ये स्थापना झाल्यापासून आयसीआयसीआय फौंडेशन लोकांच्या जीवनात परिवर्तन आणत आहे. आतापर्यंत, भारतातील जवळजवळ 3.8 लाख वंचित व गरजू लोकांना शाश्वत रोजगार मिळवण्यासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून मदत करण्यात आली आहे.
जून 24, 2015 रोजी स्थापन करण्यात आलेल्याअॅकॅडमीने आतापर्यंत 4,800 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोर्स कण्टेण्ट तयार करण्याच्या हेतूने सेंटरने नॉलेज पार्टनर म्हणून टॅली सोल्यूशन्सची भागीदारी केली आहे. अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी इंडस्ट्री पार्टनरशीही भागीदारी केली आहे. टेक महिंद्रा, टीम लीज, मॅकडॉनल्ड्स व पँटलून्स अशा नामवंत इंडस्ट्री पार्टनरनी नागपूरमधील अॅकॅडमीतील प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली आहे. सध्या, नागपूरमधील आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्समध्ये 240 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.