Published On : Mon, Jul 29th, 2019

सोनेगाव (लोधी) येथे अनेकांनी केला भाजप मध्ये प्रवेश

नागपूर: – बुटी बोरी पासून १२ की मी अंतरावरील तालुक्यातील सोनेगाव (लोधी) येथील अनेक नागरिकांनी भाजप पक्षात प्रवेश केला.अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकनिष्ठ असलेले सोनेगाव (लोधी) येथील सरपंच योगेश बाबाराव वानखेडे यांच्या सह येथील उपसरपंच ताराचंद बडीपहाडी,माजी सरपंच सुरेश बहादूरे,सेवा सहकारी सोसायटी उपाध्यक्ष चंद्रभान कडू,ग्रा प सदस्य मंगला वानखेडे,शंकर धनुले,मृणाल नेटे,नेताजी बडीपहाडी,सुधाकर कंभाले,सुनील दाभाडे,श्रावण काकडे,धनराज वानखेडे,गजानन ढेपे,गोलू इरपाते, डेनी लांडे,गजानन दहीहांडे,शुभम कंभाले,राजू बडीपहाडी,हरिदास दहीहांडे,सागर बाबाराव वानखेडे सह शेकडो लोकांनी यावेळी आ.समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजप पक्षात प्रवेश घेतले.

या प्रसंगी भाजपचे बुटी बोरतील दिग्गज नेते आकाशदादा वानखेडे,बुटी बोरी नगरपरिषद चे नगरसेवक विनोद लोहकरे तसेच परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संदीप बलवीर, बुटिबोरी, नागपुर