Published On : Mon, Jul 29th, 2019

बुटी बोरीत पकडला ९ फूट लांबीचा अजगर

Advertisement

नागपूर: बुटी बोरी एम आय डी सी तील कोलीडर्स ए सी सी कंपनीत दि २६ जुलै ला रात्री ८:३० वाजता एक जिवंत ९ फूट लांबीचा व अंदाजे १० किलो वजनाचा अजगर विदर्भ सर्पमित्र समिती चे सर्पमित्र सुशील मेश्राम,फीरोज खान यांनी पकडला.

एकीकडे सापाला शेतकर्‍याचा मित्र समजला जातो तर दुसरीकडे ९ फूट लांबीचा अजगर समोर दिसताच माणसाच्या हृदयाचे ठोके बंद पडतात.अशा परिस्थितीत एम आय डी सी मधील कोलीडर्स एस.एस.सी कंपनी मध्ये या अजगराला पाहताच सर्वत्र खळबळ उडाली असता त्यांनी तात्काळ बुटीबोरी तील सर्प मित्र सुशील मेश्राम यांना या अजगर विषयी माहिती दिली असता सुशील आपल्या मित्र सर्प मित्र फिरोज खान त्याच्यासोबत घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या नऊ फूट लांबीच्या अजगराला ताब्यात मोठ्या शिताफीने या सर्पमित्रांनी अजगर सापाला पकडले.नंतर या अजगराला वनविभाग खैरी येथे जाऊन वन विभाग अधिकारी यांच्या मदतीने जुनापाणी बीट ३११ वनक्षेत्रात सोडण्यात आले त्यावेळी वनविभागाचे RFO ढोकाल वनकर्मचारी पी. एस .वाघधरे हे उपस्थित होते.

सर्पमित्र सुशील मेश्राम :- साप या प्रण्य विविध प्रकारच्या प्रजाती पाहायला मिळतात म्हणून आपणास कोणत्याही प्रकारचा लहान अथवा मोठा साप आढळल्यास तो विषारी आहे हे स्वतःच्या मनी निश्चित न करता व त्या सापाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता तात्काळ आपल्या परिसरातील सर्प मित्राची मदत घेऊन त्या सापाला जीवन दान द्यावे.

संदीप बलवीर, बुटिबोरी, नागपुर