Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम; कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी आठ दिवसांची मुदत

Advertisement

02manoj-jarange-patil6.webp

कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यात राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा देत कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कोल्हापूर गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना आठ दिवसांच्या आत कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी त्यांनी केली असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे.

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी नवीन राजवाड्यात शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, कोल्हापूर गॅझेटमधील नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी देशात आरक्षणाची पायाभरणी केली असून त्यांच्या काळातील गॅझेटमधील नोंदी मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्यांनी शिंदे समिती आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर गॅझेटमधील कागदपत्रांचा अधिक सखोल अभ्यास करावा, अशी मागणी केली. शिंदे समितीने कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ४० हजार नोंदी शोधून काढल्या असल्या तरी त्याआधारे केवळ ३० ते ३५ हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा दावा त्यांनी केला. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात विलंब का होत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील उपलब्ध नोंदींच्या आधारे चार लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण होऊ शकते आणि तीन लाखांपेक्षा जास्त मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असा दावा करत सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

Advertisement

याशिवाय मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत, आण्णासाहेब पाटील महामंडळ अधिक सक्षम करावे तसेच कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालये स्थापन करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी संघटितपणे पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.