नागपूर : मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. अश्विन मुद्द्गगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधिक्षक अभियंता (मुख्यालय) श्री. सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात दिनांक ०५.१२.२०१८ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.
मौजा चिखली (खुर्द) येथील मानेवाडा परिसरातील १) राम मंदिर बोधीवृक्ष नगर, नाग मंदिर, नागोबा मंदिर, २) प्लॉट नं. १७७ च्या समोर, ३) माता माय मंदिर, लाडीकर लेआउट, ४) नागोबा मंदिर, ढोमणे लेआउट, ५) हनुमान मंदिर, गजानन नगर नाला, ६) हनुमान मंदिर, अभिजीत गृ.नि.स संस्था, ७) हनुमान मंदिर, महालक्ष्मी नगर नं.१, ८) नाग मंदिर, विलास नगर को. ऑप. हौ. सोसायटी जवळील अश्या एकूण ८ धार्मिक स्थळांवर आज अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली त्यांनी सामंजस्यपणा दाखवित मंदिरामधील मूर्ती स्वतः काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले. अश्या एकूण ९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही ३ टिप्पर आणि २ जेसीबी च्या साहाय्याने आज सकाळी १०.३० ते सायकांळी ६.०० वाजेपर्यंत करण्यात आली.
यावेळी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री अविनाश प्र बडगे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप एम राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श्री रवी रामटेके, श्री. विनोद खुळगे व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.