Published On : Sat, Jul 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मानेवाडा स्मशानभूमीत दिवसाढवळ्या रक्तरंजित हल्ला; जुन्या वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या

Advertisement

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा स्मशानभूमी परिसरात शनिवारी दुपारी जुन्या वैमनस्यातून झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत तरुणाची ओळख पवन सूर्यवंशी अशी झाली असून अमन काळे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वर नगर परिसरात झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेत पवन सूर्यवंशी, अमन काळे आणि अजय सोलंकी यांची नावे समोर आली होती. त्या घटनेचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, वेदांत कापटे हा गेल्या दोन महिन्यांपासून समाजमाध्यमांच्या माध्यमातून पवनच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होता. शनिवारी बोलणी करण्याच्या बहाण्याने पवनला मानेवाडा स्मशानभूमी परिसरात बोलावण्यात आले. दुपारी पवन, अमन काळे आणि अजय सोलंकी तेथे पोहोचले असता आधीपासूनच ८ ते १० जण दबा धरून बसल्याचे सांगितले जाते.

बोलणी सुरू असतानाच वाद उफाळून आला आणि आरोपींनी पवनवर चाकूने सपासप वार केले. प्राथमिक माहितीनुसार, काका उर्फ अमन चौरसिया याने पवनला ओढून त्याच्या डोक्यावर चाकूने वार केला, तर यश सरोदे याने पाठीवर वार केल्याचा आरोप आहे. अमन काळेवरही आरोपींनी चाकूने हल्ला केला.

Advertisement

हल्ल्यानंतर पवन आणि अमन यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र, काही अंतरावर पवन कोसळला. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच पवनचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. काका उर्फ अमन चौरसिया, यश सरोदे, नायडू, वेदांत कापटे, रौनक राऊत, पियुष बघेल यांच्यासह अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत असून, हुडकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.