Published On : Tue, Jan 16th, 2018

मनपातील विशेष समितीची बैठक

Advertisement

NMC-Nagpur
नागपूर: सभागृहात उपस्थित राहणाऱ्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक धोरण ठरविण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने गठित केलेल्या विशेष समितीची बैठक मंगळवारी (ता.१६) मनपा मुख्यालायतील महापौर कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत अध्यक्ष दयाशंकर तिवारी, सदस्य माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे पाटील, निगम सचिव हरिश दुबे प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपातील सर्वसाधारण सभेत सदस्यांचा मानस लक्षात घेता महाराष्ट्र अधिनियमातील कलम ४४ अंतर्गत उपस्थित होत असलेले प्रश्न, कलम १(ज) अन्वये नोटीस बजावणे, कलम १(ट)अन्वये स्थगन प्रस्ताव, कलम १ (एक्स) अन्वये लक्षवेधी प्रस्ताव देणे याविषयाबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली. या सर्व विषयांवर महानगरपालिका अधिनियमात काही तरतुदी आहे का, यावर यावेळी बैठकीत चर्चा झाली. बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येईल, अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.