Published On : Mon, Mar 19th, 2018

धावत्या रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी


नागपूर: धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने एक इसम गंभीर जखमी झाला. त्याला दक्षिण एक्स्प्रेसने नागपुरात आनल्यानंतर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप तो शुध्दीवर आला नाही, त्यामुळे त्याची ओळख पटली नाही. ही घटना सोमवारी सकाळी बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान घडली.

सिध्देश्वर (ट्रॅकमन) हे रविवारी सकाळी रेल्वे रुळावर काम करीत असताना बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान एक ३५ ते ४० वयोगटातील इसम रेल्वे रुळावर गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी लगेच सहकारी आणि अधिकाºयांना ही माहिती दिली. नागपुरला जाणाºया दक्षिण एक्स्प्रेसने त्याला येथे आनले. आरपीएफने जखमीला मेयो रुग्णालयात दाखल केले. तो अद्याप शुध्दीवर आला नाही, त्यामुळे त्याच्या विषयी अधिक माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळू शकली नाही.