Published On : Sat, Sep 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; बेलतरोडी पोलिसांकडून आरोपीला अटक

Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; बेलतरोडी पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी ४१ वर्षीय आरोपी इजारूल हक अन्सारी, रा. हसनबाग, याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. मात्र, २०२४ मध्ये तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती आईसोबत राहत होती. दुसऱ्या विवाहासाठी तिने एका विवाह संकेतस्थळावर आपली माहिती नोंदवली होती. याच माध्यमातून तिची आरोपी इजारूल हक अन्सारी याच्याशी ओळख झाली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बेलतरोडी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप आहे. तेथे त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही काळानंतर महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर महिलेने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार; बेलतरोडी पोलिसांकडून आरोपीला अटक

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.