Published On : Fri, Jun 22nd, 2018

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; पुरोहित यांचा फैसला आता 16 जुलैला!

नवी दिल्ली : २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला १६ जुलैला होणार आहे. कर्नल पुरोहित यांच्या ‘या खटल्यातून आपल्याला दोषमुक्त करावे’, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज (शुक्रवारी) मुंबई हायकोर्ट अंतिम सुनावणीसाठी १६ जुलै हि तारीख निश्चित केली आहे.

मालेगावमधील २००८ मधील बॉम्बस्फोटांप्रकरणी १० वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्यानं, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असं म्हणत आरोपमुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली आहे.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कर्नल पुरोहित यांच्याविरोधात खटला चालवण्यास सरकारने दिलेल्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर खटल्यातून दोषमुक्त करण्याची त्यांची मागणी विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने फेटाळून लावली होती. पुरोहित यांच्या या याचिकेला एनआयएनं मात्र विरोध केला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पुरोहित यांना एनआयए कोर्टात जाण्याचे निर्देश दिले असल्यानं, हायकोर्टात त्यांनी असा अर्ज करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

यावरच आज न्यायमूर्ती आर. एम. मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी १६ जुलै ही तारीख निश्चित केली आहे.

Advertisement
Advertisement