Published On : Fri, Jun 22nd, 2018

स्वच्छतेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई: ‘स्वच्छ भारत अभियान’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशपातळीवर राबविला जाणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छतेविषयीच्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. या स्पर्धेत झारखंडने बाजी मारली असून, ते देशातील पहिला क्रमांक पटकावणारे राज्य ठरले आहे. स्वच्छ राजधानीचे शहर या स्पर्धेतही मुंबईचा चौथा क्रमांक लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील निवड झालेल्या शहरांचा गौरव परवा (ता.23) इंदूर येथे होणार आहे.

2015 पासून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात देशभरातील शहरे, राज्यांच्या राजधानीची शहरे यांचा समावेश आहे. दर वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र अशा संस्थेमार्फत देशातील शहरांची विविध निकषांच्या आधारे तपासणी केली जात असून या तपासणीच्या आधारे गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे मानांकन आणि क्रमांक काढले जातात तर दर वर्षी ही तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते. या वेळी ‘कार्वे’ या सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलल्या कंपनीने देशपातळीवरील शहरांचे मानांकन केले आहे.

Advertisement

घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था, नगर नियोजन, दळणवळण नियोजन, आदी घटक शहरांची तपासणी करताना गृहीत धरले जातात. या निकषांच्या आधारे निवड झालेल्या शहरांमध्ये राज्यातील नऊ शहरांचा समावेश आहे. मुंबई उपनगराचा राजधानीचे सर्वांत स्वच्छ शहर म्हणून देशात पहिला क्रमांक लागला आहे. तर नागपूर, नवी मुंबई, भिवंडी, भुसावळ, पाचगणी, सेंद्रारांजणगाव, सासवड या शहरांचा समावेश आहे. नवी मुंबई शहराला घनकचरा व्यवस्थापनात बक्षीस मिळाले असून देशभरातील ४८ शहरांची विविध गटांत निवड केली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement