Published On : Fri, Jul 12th, 2019

जनसेवेच्या संधीचे सोने करा : महापौर नंदा जिचकार

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी स्वीकारला पदभार

नागपूर : महानगरपालिका लोकांच्या कल्याणासाठी काम करते. नागरिकांच्या समस्या लक्षात घेउन त्यांना न्याय देण्याचे कार्य मनपातर्फे होत असते. यामध्ये महत्वाची भूमिका ही विशेष समित्यांची असते. गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. समाजातील समस्या सोडविण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या समितीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून जनसेवेची संधी सभापतीच्या रूपात लाभली आहे. या जनसेवेच्या संधीचे सोने करा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती म्हणून शुक्रवारी (ता.१२) नगरसेविका तारा (लक्ष्मी) यादव यांनी पदभार स्वीकारला. समिती सभापतींच्या कक्षामध्ये आयोजित पदग्रहण समारंभात महापौर नंदा जिचकार बोलत होत्या.

याप्रसंगी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या उपसभापती उषा पॅलट, विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या उपसभापती मिनाक्षी तेलगोटे, समितीचे सदस्य प्रमोद कौरती, सदस्या रूतिका मसराम, नगरसेविका सोनाली कडू, अर्चना पाठक, वनिता दांडेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, समाजातील तळागाळातील व शेवटच्या घटकातील व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून त्यांच्या जीवनात सुलभता निर्माण करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. तारा (लक्ष्मी) यादव या सुद्धा मागील अनेक वर्षांपासून समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी काम करतात. त्यामुळे त्यांना या क्षेत्राची जाणीव आहे. त्यामुळे त्याच्या त्यांना फायदा होईल व गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

झोपडपट्टीतील नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी कार्य करणार : तारा (लक्ष्मी) यादव
समाजातील जनतेच्या सेवेसाठी पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी यापूर्वी पदाधिका-यांनी केलेल्या कामाचे महत्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. पट्टे वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व इतर योजना लोकापर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा विश्वास गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या नवनिर्वाचित सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन समितीच्या सदस्या नगरसेविका रूतिका मसराम यांनी केले.

Advertisement
Advertisement