Published On : Fri, Jul 12th, 2019

बसची उभ्या टिप्परला

Advertisement

रामटेक: -रामटेक -तुमसर रोड वर कान्द्री गावाजवळ बसने टिप्परला धडक दिल्याने टिप्पर चालकाचा मृत्यू झाला आहे, देवेंद्र नथ्थुजी काळसर्पे राहणार नागपूर असे मृतक चालकाचे नाव असून अपघातानंतर बस चालक घटना स्थळावरून पसार झाला आहे. ही मानव विकास ची बस असल्याने विद्यार्थी असतात मात्र अपघाताच्या काही वेळा पूर्वीच सर्व विद्यार्थी उतरल्याने मोठा अनर्थ टळला.दिनांक 11 जुलाइ ला सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाळूचा टिप्पर क्र. MH-31 CQ-9564 हा वाळूचा ट्रक तुमसर वरून रामटेक च्या दिशेने जात असतांना कान्द्री गावाच्या जवळ या टिप्परचा चाक पंचर झाला,

त्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला लावून टिप्पर च्या मागे झाडाच्या हिरव्या फांद्या ही लावल्या आणि नंतर जॅक लावून टायर काढण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक मागून आलेल्या बस क्रमांक MH_07 C 9524 या चालकाने जोरदार धडक दिल्याने जॅक घसरले त्यामुळे टिप्पर चालक हा चाकाखाली आल्याने त्याच्या टायर मध्ये दबून जागीच मृत्यू झाला. बस ही तुमसर वरून रामटेक च्या दिशेने जात होती,

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मानव विकासची ही बस असल्याने या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी होते मात्र अपघाताच्या पूर्वीच हे सर्व विद्यार्थी आपल्या स्थानकावर उतरल्याने अपघाताच्या वेळी चालक, वाहक आणि केवळ एक व्यक्ती असल्याने मोठा अपघात टाळला आहे. आज पर्यंत वाळू च्या टिप्पर ने अपघात केल्याची घटना आपण बरेच द घडली मात्र आज या टिप्पर चालकांची कोणतीही चूक नसतांना त्याचा नाहकच जीव गेला आहे.

> > या अपघाताची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस घटना स्थळी पोहचून मृतकला शव विच्छेदनासाठी नेण्यात आले असून बस चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सुरु आहे .

Advertisement
Advertisement
Advertisement