Published On : Wed, Feb 19th, 2020

बनावट पासपोर्ट प्रकरणातील पसार नायजेरियन फुटबॉल खेळाडू अटकेत

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथे बनावट पासपोर्ट च्या आधारे वास्तव्य करून फुटबॉल खेळाडू म्हणून कार्यरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसानी 2015 मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणाचा गौप्यस्फोट उघडकीस आणून नायजेरियन खेळाडू वर गुन्हा दाखल करण्यात आला होता .

या गुन्हे प्रकरणातील पसार आरोपीच्या शोधकामी नवीन कामठी पोलिसांना गती दिले असता सदर आरोपी 2015 पासून पसार असून केरळ राज्यातील कोझोकोड शहरात वास्तव्यास असून रायल्स ट्रॅव्हल्स क्लब कडून फुटबॉल खेळत असल्याची मिळालेल्या माहिती वरून नवीन कामठी पोलिसानी सापळा रचून केरळ राज्यातील जिल्हा कँनूर इर्फफुर येथे धाड घालून आरोपीस ताब्यात घेत अटक करण्याची यशस्वी कारवाही केली असून अटक आरोपी चे नाव आकोयो इंमयानुयल औग्यूलुओ उर्फ जेम्स कोलीन वय 28 वर्षे जिल्हा माललापुरंम असे आहे.

Advertisement

ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस उपनिरीक्षक कांडेकर,सहाययक फौजदार गजानन पेशने, हर्षद वासनिक, प्रशांत, सुरेंद्र आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement