Published On : Wed, Feb 19th, 2020

बारावीच्या पहिल्या पेपर मध्ये परीक्षा हॉल मध्ये निघाला साप.

रामटेक शहर प्रतिनिधी-आज बारावीचा पहिला पेपर असल्यानी विध्यार्थी आप-आपल्या परीक्षा स्थळी पोचहले परीक्षा सुरू झाली काही वेळाने रामटेक येथील समर्थ हायस्कुल येथे परीक्षा हॉल मध्ये परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना साप दिसून आला त्यांनी परीक्षा हॉल मध्ये असलेल्या परीक्षा निरीक्षक यांना सांगितले

त्यांनी कोणताही वेळ न घालवता सर्प मित्र राम राऊत यांना कॉल करून बोलावलं सर्प मित्र राम राऊत यांनी आपले मित्र मयूर हेण्डकुळे यांचा सोबत कोणताही वेळ न घालवता हायस्कुल मध्ये पोहचले सर्प मित्र यांनी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न होता सापाला पकडले व सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले. समर्थ हायस्कुल येथील सर्व शिक्षकांनी सर्प मित्र राम राऊत व मयूर हेण्डकुळे यांचे आभार मानले.