Published On : Wed, Oct 14th, 2020

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : परतीच्या पावसाने भंडारा जिल्हयात धान पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची महसूल, कृषी विभाग व विमा कंपन्यांनी संयुक्त मोका तपासणी करून तात्काळ पंचनामे करावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मागिल आठवडयात जिल्हयात झालेल्या परतीच्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिण्यात वैनगंगेला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभाग, कृषी विभाग व विमा कंपन्यांनी संयुक्त मोका तपासणी व नुकसाणीचे पंचनामे तात्काळ करून शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही हलगर्जी न करता विमा कंपन्यांनी प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ही वस्तूस्थिती असून विमा कंपण्यांनी या बाबत चालढकल न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा देण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.

पिक विमा व नुकसान भरपाईपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहता कामा नये, याची खबरदारी महसूल, कृषी विभाग व विमा कंपन्यांनी घ्यावी असे निर्देश पटोले यांनी दिले.