रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेला वाद आता उघड नाराजीत बदलला असून पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचा राजीनामा सादर केला आहे.
रायगड जिल्हाध्यक्षपदासाठी संदीप ठाकूर यांचे नाव चर्चेत असताना पक्ष नेतृत्वाने रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली. या निर्णयानंतर स्थानिक स्तरावर नाराजीचे सूर उमटू लागले होते. त्यातच माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे असंतोष व्यक्त केल्याची चर्चा होती.
संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनीही पदे सोडल्याने रायगडमधील मनसे संघटनेत मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, ठाकूर यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट केवळ कौटुंबिक स्वरूपाची होती आणि तिचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत बोलताना ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. लोकांमध्ये राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या नेतृत्वासोबत काम करण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
रायगडमधील या घडामोडींमुळे मनसेच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवसांत या राजकीय नाराजीचे नेमके रूप काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews





