नागपूर– विभागातील महसूल यंत्रणेत महत्त्वाचे बदल करत महसूल व वन विभागाने २३ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला असून, विविध जिल्ह्यांतील महसूल कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळाला आहे.
या पदोन्नती प्रक्रियेत सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सहायक महसूल अधिकारी गटातील तीन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यापैकी दोघांना नियमित बढती देण्यात आली आहे. तर एका अधिकाऱ्याला विभागीय चौकशीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.
याशिवाय मंडळ अधिकारी संवर्गातील २० अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियमित नायब तहसीलदार पदावर बढती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांतील रिक्त जागांवर करण्यात आली आहे.
शासनाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नवीन पदावर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. आदेश जारी झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे अनिवार्य करण्यात आले असून, निर्धारित मुदतीत हजर न झाल्यास पदोन्नती रद्द करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे.
दरम्यान, नवीन पदावर प्रत्यक्ष रुजू झाल्यानंतरच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ लागू होणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने नियमित नियुक्तीचा कोणताही दावा संबंधित अधिकाऱ्यांना करता येणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे नागपूर विभागातील महसूल विभागातील रिक्त पदांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून, प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate
कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...





