नागपूर : शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीत एनडीपीएस पथकाने ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 34 किलो गांजा जप्त करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक, कार, मोबाईल फोनसह एकूण सुमारे 29 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमिया कॉम्प्लेक्ससमोर, शिवमंदिराजवळ उशिरा रात्री करण्यात आली. एनडीपीएस पथक गस्त घालत असताना एका अशोक लेलँड ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारदरम्यान संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही वाहनांतील व्यक्तींना थांबवून चौकशी केली असता त्यांची उत्तरे संशयास्पद वाटली.
यानंतर पंचांसमक्ष वाहनांची झडती घेण्यात आली. तपासादरम्यान ट्रक आणि कारमधून 34 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सय्यद सुमेल, मोहम्मद अनस, रवि साहू, अनिकेत गायनेर, अमन गायधने आणि आकाश विटोले या सहा आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेला आकाश विटोले हा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवासी असून तो या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी आकाश याने ओडिशातील संबलपूर येथील एका फरार तस्कराकडून गांजाची खेप मागविल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. ट्रक चालकाच्या माध्यमातून ही खेप संबलपूरहून नागपुरात आणण्यात आली होती.
पोलिसांनी कारवाईदरम्यान अशोक लेलँड ट्रक, स्विफ्ट डिझायर कार, 8 मोबाईल फोन आणि गांजासह एकूण सुमारे 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात ओडिशातील संबलपूर येथील विजय कुमार बहेरा या मुख्य तस्कराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate
कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...





