मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक लाभांमध्ये वाढ जाहीर केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली असून तो 8, 16 आणि 24 टक्क्यांवरून अनुक्रमे 10, 20 आणि 30 टक्के करण्यात आला आहे.
याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीच्या दरातही सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी दोन टक्के असलेली वार्षिक वाढ आता तीन टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांचे कल्याण अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढ, भत्ते आणि इतर सुविधांबाबत सातत्याने मागण्या करण्यात येत होत्या. सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध कर्मचारी संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
याचवेळी परिवहनमंत्री सरनाईक यांनी खासगी बसमधून होणाऱ्या अवैध पार्सल वाहतुकीबाबतही इशारा दिला. नियमांचे उल्लंघन करून पार्सल वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





