Published On : Fri, Jun 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Advertisement

पुणे : लोहगड किल्ल्यावरून तरुण केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तत्काळ मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हा नियोजित खून असल्याचे समोर आले. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी विनंती त्यांनी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाला आवश्यक निर्देश दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानेही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास उज्ज्वल निकम यांनीही संमती दिली आहे.

या प्रकरणाच्या तपासात आणखी एक घडामोड समोर आली असून, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्याचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली. तपासाशी संबंधित कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, अग्रवाल कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने सर्व बाबींची गंभीरपणे चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges