नागपूर : सायबर गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून आता ते सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलिस अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करू लागले आहेत. नागपूर गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सागर आव्हाड यांच्या बँक खात्यातून सायबर भामट्यांनी तब्बल 1 लाख 50 हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एपीआय सागर आव्हाड हे नुकतेच सायबर फसवणुकीतील एका आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथकासह चंदीगड येथे गेले होते. आरोपीला ताब्यात घेऊन नागपूरला परतत असताना त्यांचा मोबाईल फोन हरवला. नागपुरात परतल्यानंतर त्यांनी तातडीने इमामवाडा पोलिस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली.
याच संधीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलद्वारे बँक खात्यात प्रवेश मिळवला. 18 जून रोजी त्यांच्या अॅक्सिस बँक खात्यातून 50 हजार रुपयांचे दोन व्यवहार करण्यात आले. याची माहिती मिळताच आव्हाड यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून यूपीआय सेवा बंद केली तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवली.
मात्र, त्यानंतरही भामट्यांनी 21 जून रोजी आणखी 50 हजार रुपये खात्यातून काढले. अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 1 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी रवींद्र जाधव यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बँक व्यवहार, मोबाईल डेटा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मोबाईल हरवल्यास तातडीने सिम कार्ड, बँकिंग सेवा आणि यूपीआय ब्लॉक करणे, सर्व पासवर्ड बदलणे तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews





