Published On : Fri, Jun 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही; विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

Advertisement

नागपूर : राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांना स्वतः वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, “मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असून पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे ठामपणे सांगितले आहे.

राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चेमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारही काँग्रेस सोडून ‘धनुष्यबाण’ हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या सर्व वृत्तांवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “या केवळ निराधार अफवा आहेत. मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा-जेव्हा मी महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवतो, तेव्हा माझ्याबाबत खोट्या अफवा पसरवल्या जातात. कधी मी शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जाते, तर कधी पक्षबदलाच्या बातम्या पसरवल्या जातात. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा जाणीवपूर्वक केला जाणारा प्रयत्न आहे.”

Advertisement

उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण-
महाविकास आघाडीतील नेत्यांबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी, “महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याला शिवसेनेत यायचे असल्यास त्याचे स्वागतच आहे. विजय वडेट्टीवार आले तर पक्षाला अनुभवी नेतृत्व मिळेल,” असे वक्तव्य केले होते. मात्र, सध्या कोणतेही ‘ऑपरेशन’ किंवा विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

विचारांशी तडजोड करणार नाही-
उदय सामंत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले, “माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मी काँग्रेसच्या विचारसरणीशी पूर्णपणे बांधील आहे. कोणत्याही पदासाठी किंवा सत्तेसाठी माझ्या तत्त्वांशी आणि विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

माध्यमांवरही नाराजी-
काही माध्यमांवरही वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. “कोणतेही ठोस तथ्य नसताना अशा प्रकारच्या बातम्या आणि चर्चा करून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. राज्यात शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर चर्चा करण्याऐवजी अफवा पसरवून लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांकडून हटवले जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

Advertisement
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges