Published On : Thu, Jun 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; १२१ ग्रॅम एमडी पावडरसह युवकाला अटक

Advertisement

नागपूर : शहरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेंतर्गत कपिल नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत १२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एमडी ड्रग्ज, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण ६ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक युवक एमडी ड्रग्ज विक्रीसाठी कबीर नगर चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कपिल नगर पोलिसांनी सापळा रचत उप्पलवाडी पोस्ट ऑफिस मार्गावरील डब्ल्यूसीएल स्पेशल ट्रिब्युनल कोर्टासमोर संशयितावर नजर ठेवली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंचांसमक्ष संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून १२१ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे ६ लाख ८ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख २५ वर्षीय तुलशीराम रामनाथ ठाकूर (रा. समता नगर, जरीपटका) अशी झाली आहे. आरोपीकडून एक मोटारसायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

प्राथमिक चौकशीत आरोपीने हे अमली पदार्थ गौरव नंदागवली नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

नागपुरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन थंडर” अंतर्गत ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.